Restraining order : नगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

0
Restraining order : नगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
Restraining order : नगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

काेड रेड

Restraining order नगर : नगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) अधिनियमचे कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश (Restraining order) जारी केले आहे.

हे देखील वाचा : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे

नगर जिल्ह्यात सभा, महासभा, आंदाेलनाच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडुके, बंदुका आदी वस्तू बाळगण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे काेणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे.

नक्की वाचा : सीना पुलाचे सुजय विखे, संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; विरोधकांना लगावला टोला

हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींंना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्यांना लागू होणार नाही. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, मिरवणूका, लग्न समारंभासाठी ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here