काेड रेड
Restraining order : नगर : नगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) अधिनियमचे कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार २ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश (Restraining order) जारी केले आहे.
आंदाेलन, उपाेषणाला मनाई आदेश जारी
नगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पडावी, या दृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये 16 मार्च ते 13 मे या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उप विभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये तसेच शासकीय विश्रामगृह येथे कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आली आहे.
नक्की वाचा : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार
स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी
नगर जिल्ह्यात सभा, महासभा, आंदाेलनाच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी २० मार्च ते २ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडुके, बंदुका आदी वस्तू बाळगण्यास, तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे काेणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे.
हे देखील वाचा : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल
यांना आदेश लागू होणार नाही (Restraining order)
हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींंना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्यांना लागू होणार नाही. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, मिरवणूका, लग्न समारंभासाठी ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
फेकन्यूजची माहिती देण्यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कालावधीमध्ये उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्यूजची माहिती जनतेकडून मिळण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक 9156438088 जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.