Rev. N. V. Tilak : रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या बाप्तिस्मा दिनाचा १३१ वा स्मृतीदिन श्रद्धाभावाने साजरा

Rev. N. V. Tilak : रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या बाप्तिस्मा दिनाचा १३१ वा स्मृतीदिन श्रद्धाभावाने साजरा

0

Rev. N. V. Tilak : नगर : मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या वतीने सुप्रसिद्ध संतकवी रेव्ह. ना. वा. टिळक (Rev. N. V. Tilak) यांच्या बाप्तिस्मा (Baptism) विधी दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यंदा त्यांच्या बाप्तिस्मा विधीला १३१ वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक (Historical) क्षणाचे स्मरण भाविकांनी आदरपूर्वक केले.

अवश्य वाचा: बारावीची परीक्षा सुरू ; कर्जत तालुक्यात ३ हजार १८० विद्यार्थ्यांनी दिला पेपर

Rev. N. V. Tilak : रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या बाप्तिस्मा दिनाचा १३१ वा स्मृतीदिन श्रद्धाभावाने साजरा
Rev. N. V. Tilak : रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या बाप्तिस्मा दिनाचा १३१ वा स्मृतीदिन श्रद्धाभावाने साजरा

मराठी व ख्रिस्ती साहित्यात मोठे योगदान

गेल्या शतकातील महान संतकवी रेव्ह. ना. वा. टिळक यांनी १० फेब्रुवारी १८९५ रोजी मुंबईतील भेंडी बाजार येथील चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून बाप्तिस्मा घेतला होता. त्या काळात त्यांनी घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजजीवनात मोठी खळबळ उडवणारा ठरला होता. विशेष म्हणजे, परकीय व्यक्तीकडून नव्हे तर रेव्ह. तुकाराम नथोजी यांच्या हस्ते हा पवित्र विधी व्हावा, अशी त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणेच हा विधी पार पडला.
रेव्ह. ना. वा. टिळक यांनी आपल्या आयुष्यात शंभरहून अधिक भक्तिगीते, अभंग, ओव्या तसेच २१०० हून अधिक कविता रचून मराठी व ख्रिस्ती साहित्यात मोठे योगदान दिले.

नक्की वाचा: राजयोगाच्या नियमित अभ्यासाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो : साधना दिदी

Rev. N. V. Tilak : रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या बाप्तिस्मा दिनाचा १३१ वा स्मृतीदिन श्रद्धाभावाने साजरा
Rev. N. V. Tilak : रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या बाप्तिस्मा दिनाचा १३१ वा स्मृतीदिन श्रद्धाभावाने साजरा

त्यांचे महाकाव्य आजही साहित्यविश्वात मानाचे स्थान राखून (Rev. N. V. Tilak)

‘ख्रिस्तायन’ हे त्यांचे महाकाव्य आजही साहित्यविश्वात मानाचे स्थान राखून आहे. त्यांच्या साहित्य आणि कार्यामुळे ख्रिस्ती समाजावर त्यांनी मोठे ऋण ठेवले. त्यांच्या कार्याची परंपरा आजही प्रेरणादायी ठरत आहे. या स्मृतीदिनानिमित्त मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रॉबर्ट निकाळजे, रेव्ह. देवदत्त कसोटे, नाशिक धर्मप्रांताचे कोषाध्यक्ष अँड. विनायक पंडित, अ.नगर पहिली मंडळीचे ज्येष्ट विश्वस्त राजविलास साळवे, सुधाकर ठोंबरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू देठे, महाराष्ट्र सी नडचे मॉडरेटर रेव्ह. संजय मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक संजय आढाव, सचिन ठोंबरे आदी मान्यवर होते. उपस्थितांनी रेव्ह. टिळक यांच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.