Revenue : जिल्ह्यात नगर तहसील वसुलीत अव्वल स्थानी; उद्दिष्टांचा ९८ टक्के वसुली

Revenue : जिल्ह्यात नगर तहसील वसुलीत अव्वल स्थानी; उद्दिष्टांचा ९८ टक्के वसुली

0
Revenue : जिल्ह्यात नगर तहसील वसुलीत अव्वल स्थानी; उद्दिष्टांचा ९८ टक्के वसुली
Revenue : जिल्ह्यात नगर तहसील वसुलीत अव्वल स्थानी; उद्दिष्टांचा ९८ टक्के वसुली

Revenue : नगर : गेल्या अकरा महिन्यांत महसूल विभागाने (Revenue Department) १४५ कोटी ७२ लाख ३७ हजार रुपयांची महसूल (Revenue) वसुली शासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी ७१ कोटी ५९ लाख रुपयांची महसूल वसुली करण्याचे आव्हान महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांची धावपळ सुरु आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) तहसील कार्यालयाच्या वतीने उद्दिष्टच्या ९८ टक्के वसुली झाली असून जिल्ह्यात महसूल वसुलीमध्ये अहिल्यानगर तालुका अव्वल स्थानी आहे.

नक्की वाचा : नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

निवडणूक कालावधीमुळे महसूल वसुलीकडे दुर्लक्ष

उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय शिंदे, अपर तहसीलदार स्वप्नील ढवळे, महसूल नायब तहसीलदार अभिजित वांढेकर, गौरव दळवी, लिपिक प्रदीप आव्हाड, कंठेवाड नागमणी, अशोक तांदळे, सर्व मंडळाधिकारी, तलाठी यांनी ही कामगिरी केली. राज्य शासनाने महसूल विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जमीन महसूलच्या माध्यमातून ३९ कोटी रुपयांचे रुपयांचा महसूल जमा करण्याचे टार्गेट दिले आहे. मध्यंतरी नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी तसेच मतदान व मतमोजणी आदी कामांसाठी सर्व महसूल यंत्रणा कामाला लागली होती. त्यामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर हे तीन महिने निवडणुकीतच गेले. त्यामुळे महसूल वसुलीकडे दुर्लक्ष झाले.

अवश्य वाचा : राहुरी नगरपरिषदेची पोलीस बंदोबस्तात पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई

अकरा महिन्यात ३१ कोटी रुपयांचा जमीन महसूल प्राप्त (Revenue)

१ एप्रिल २०२४ ते १२ मार्च २०२५ या जवळपास अकरा महिन्यात ३१ कोटी रुपयांचा जमीन महसूल प्राप्त झाला आहे. जवळपास ९८ टक्के महसूल वसूल झाला आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी महसूल यंत्रणा सरसावली आहे. गावपातळीवर कोतवाल आणि तलाठी यांची धावपळ सुरु असून, दररोज तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडून नियोजन केले जात आहे.