Revenue Department : नगर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत कोपरगाव मंडळाधिकारी कार्यालयात आयोजित शिबिरात १३६ महसूल दाखल्यांचे (Certificates) तहसीलदार महेश सावंत यांचे हस्ते वाटप करण्यात आले. या शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना महसूल विषयक (Revenue Department) विविध दाखले व लाभ प्रदान करण्यात आले.
नक्की वाचा : विशेष पोलीस पथकाचा मटका बुकींवर छापा; २२ आरोपींवर कारवाई
कोपरगाव तहसीलदार यांनी केले मार्गदर्शन
शिबिरास शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात उत्पन्न दाखले – ४०, जातीचे दाखले – २२, जिवंत ७/१२ मोहिमेंतर्गत वारस फेरफार – ८, रेशनकार्ड वाटप – २१, ७/१२ व ८ अ उतारे – ४५, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी – १८ अशा एकूण १३६ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
अवश्य वाचा : आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महसूल सेवक व कर्मचारी उपस्थित (Revenue Department)
यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मंडळाधिकारी मच्छिंद्र पोकळे, ग्राम महसूल अधिकारी जगदीश शिरसाठ, अश्विनी निर्मळ, वैशाली दुकळे, वाल्मिक पवार तसेच महसूल सेवक व कर्मचारी उपस्थित होते.