Revenue Officer : अन्यथा महसूल कर्मचारी संघटनेचे सोमवारपासून काम बंद आंदोलन

Revenue Officer : अन्यथा महसूल कर्मचारी संघटनेचे सोमवारपासून काम बंद आंदोलन

0

Revenue Officer : श्रीगोंदा: महाराष्ट्र (Maharashtra) राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात शासन स्तरावरुन कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा महसूल कर्मचारी (Revenue Officer) संघटनेच्या वतीने दोन दिवस विविध पद्धतीने आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर १५ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन (Indefinite strike) करणार असल्याचे संघटनेने निवेदनाद्वारे कळवले आहे.

अवश्य वाचा: विधानसभेच्या निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकणार; शरद पवारांचा दावा

संघटनेच्या मागण्यांसदर्भात कार्यवाही नसल्याने आंदोलन

याबाबत तहसीलदार श्रीगोंदा यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात शासन स्तरावरुन कोणतीही कार्यवाही होत नसल्याने १० जुलैपासून संघटनामार्फत आंदोलन करण्याचा इशारा शासनास देण्यात आलेला होता. श्रीगोंदा महसूल कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होत १० जुलै रोजी काळ्या फित लावून शासकीय काम करण्यात आले.

अवश्य वाचा: नक्की वाचा: आमदार रोहित पवार यांचे उपोषण मागे

अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलन करणार (Revenue Officer)

तर ११ जुलै रोजी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. तर आज १२ जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असून मागण्या मान्य झाल्या नाही तर १५ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती श्रीगोंदा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आदेश जावळे यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष विकिल बहुरे, सरचिटणीस दिगंबर पवार, खजिनदार अलका कंद, प्रतिनिधी शरद झावरे, घनश्याम गवळी, शिल्पा कदम, बाळासाहेब जाधव, जनार्धन सदाफुले, राजेश सोनवर, सचिन जाधव, अलका चव्हाण, मच्छिंद्र कासार, निलेश एडके, मनोज जाधव, मंगेश ढूमने, चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रकाश फिरके, रोहिदास शेलार, दादा घोडके, भरत ससाणे, वाहनचालक प्रतिनिधी विकास गाडीलकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here