Revenue Satisfaction Camp : महसूल समाधान शिबिराने नागरिकांना दिलासा : अमोल खताळ

Revenue Satisfaction Camp : महसूल समाधान शिबिराने नागरिकांना दिलासा : अमोल खताळ

0
Revenue Satisfaction Camp : महसूल समाधान शिबिराने नागरिकांना दिलासा : अमोल खताळ
Revenue Satisfaction Camp : महसूल समाधान शिबिराने नागरिकांना दिलासा : अमोल खताळ

Revenue Satisfaction Camp: संगमनेर : महायुती सरकारच्या माध्यमातून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली. त्याच धर्तीवर आता “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” (Revenue Satisfaction Camp) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध दाखल्यांसाठी संगमनेर शहरात जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल तसेच होणारी गैरसोय दूर होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी व्यक्त केला. 

नक्की वाचा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यूपीएससीतील यश प्रेरणादायी : अमोल खताळ

Revenue Satisfaction Camp : महसूल समाधान शिबिराने नागरिकांना दिलासा : अमोल खताळ
Revenue Satisfaction Camp : महसूल समाधान शिबिराने नागरिकांना दिलासा : अमोल खताळ

दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

आमदार खताळ म्हणाले की, पूर्वी शालेय दाखले सेतू केंद्रातून मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी मोठी धावपळ करावी लागत होती. मात्र राज्य सरकारने आता शाळा आणि महाविद्यालयांमधूनच दाखले देण्याचा उपक्रम सुरू केला त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली आहे. राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि कष्टकरी कामगार यांना केंद्रस्थानी ठेवून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू केली आहे. तसेच साडेसात एचपीपर्यंतच्या वीजपंपांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णयही घेतला आहे.

अवश्य वाचा : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर;  लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

Revenue Satisfaction Camp : महसूल समाधान शिबिराने नागरिकांना दिलासा : अमोल खताळ
Revenue Satisfaction Camp : महसूल समाधान शिबिराने नागरिकांना दिलासा : अमोल खताळ

गावा-गावांत आधार केंद्र सुरू (Revenue Satisfaction Camp)

याशिवाय हजार लोकसंख्येच्या गावांना जोडणारे सुमारे २९ हजार किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीसंदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागात आधार कार्डमधील किरकोळ दुरुस्त्यांसाठी नागरिकांना अडचणी येत असल्यामुळे गावा-गावांत आधार केंद्र सुरू करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक गरजू नागरिकांना मदत मिळत असून या योजनेतील प्रलंबित प्रकरणेही लवकरच मार्गी लावली जातील. तसेच पुरवठा विभागामार्फत नवीन रेशन कार्ड, नाव कमी-जास्त करणे व दुरुस्ती यांसारखे प्रश्नही सोडवले जात आहे. 

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

महसूल विभागात निर्माण झालेली अकार्यक्षमता दूर करण्याचे काम

महाविकास आघाडीच्या काळात महसूल विभागात निर्माण झालेली अकार्यक्षमता दूर करण्याचे काम सत्तांतरानंतर महायुती सरकारने केले आहे. हा विभाग आता जनतेसाठी अधिक कार्यक्षम झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री योगेश कदम तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

खताळ यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ

तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रांताधिकारी अरुण उंडे, वनविभागाचे उपवनसंरक्षक अमरजीत पवार, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, सरपंच लता खताळ, भाजप उपाध्यक्ष अशोक कानवडे, शिवसेनेचे माजी सरपंच मीनानाथ शेळके, दिलीप कोल्हे, डॉ. महेंद्र कोल्हे, अण्णासाहेब गोडसे, भाऊसाहेब खताळ, मीनानाथ खताळ, अतुल खताळ, सागर खताळ, हरीश वनवे, भागवत कानवडे, साहेबराव वलवे, नितीन खताळ, सतीश कोकणे, उमेश कोकणे, मिलिंद खताळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार खताळ यांच्या हस्ते विविध प्रकारच्या दाखल्यांचे लाभार्थ्यांना वाटप देखील करण्यात आले.