Reward | नेवासा मुली शाळेने पटकावला तालुक्यात तृतीय क्रमांक

नेवासा पंचायत समिती येथे बक्षीस वितरण

0

Reward | नेवासा:  राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुली शाळेने तालुक्यात तृतीय क्रमांक (Reward) पटकावला. शासनातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या अंतर्गत राबविण्यात आलेल्या शासनाच्या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुली शाळेने सहभाग घेतला होता.

अवश्य वाचा- कोठला परिसरात गोळीबार करणारे दोघे जेरबंद बंद

नेवासा पंचायत समिती येथे बक्षीस वितरण (Reward)


नेवासा पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात गटविकास अधिकारी संजय लखवाल,नगरपंचायत मुख्याधिकारी निखिल फराटे, गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर, घोडेगाव ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र देसरडा यांच्या हस्ते व पत्रकार सुहास पठाडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा नेवासे मुली शाळेचे मुख्याध्यापक अरविंद घोडके, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा पठाडे, उपाध्यक्षा अनिता डोकडे, भावना चव्हाण, शिक्षक शरद मचे,विठ्ठल कांगुणे, प्रतिभा पालकर,सुनीता वणे, ज्योती बोरुडे, वर्षा जगताप,वैशाली कुलट, व्यवस्थापन समितीचे सचिन गव्हाणे, शाम डोकडे,गौरव चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. 

नक्की वाचा- डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?

विविध घटक व उद्दिष्टांवर शाळेने केले काम (Reward)


यावेळी विस्ताराधिकारी मिरा केदार, रुक्साना शेख, केंद्र प्रमुख संजय शेळके, रवींद्र कडू, बाळासाहेब काशिद,कमल लाटे,विषय शिक्षक सामी शेख उपस्थित होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन,अध्यापन,प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयतिक स्वच्छता,चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न,अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास आदी अशा अनेक विविध घटक व उद्दिष्टांवर शाळेने काम केले. तालुक्यातील २५१ शाळांचे मूल्यांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा नेवासा मुली शाळेने पटकविला.