Rigorous Imprisonment : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची सक्त मजुरी शिक्षा 

Rigorous Imprisonment : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची सक्त मजुरी शिक्षा 

0
Rigorous Imprisonment : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची सक्त मजुरी शिक्षा 
Rigorous Imprisonment : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची सक्त मजुरी शिक्षा 

Rigorous Imprisonment : नगर : सरकारी कामात अडथळा आणून एसटी वाहकास लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केल्याप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (District and Additional Sessions Judge) यांनी दोन आरोपींना दोषी ठरवत सहा महिन्यांची सक्त मजुरी (Rigorous Imprisonment) व सात हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

अवश्य वाचा: उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

शिक्षा झालेल्या आरोपींची नावे

प्रज्योत उर्फ शिवम प्रकाश लुनिया (वय ३५) आणि तेजस पांडुरंग वामन (वय २०, रा. वराडवाडी, भिंगार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ३० मार्च २०२२ रोजी दुपारी ३.१५ वाजता, माळीवाडा बस स्थानकावरून एसटी बस शेवगावकडे रवाना होत असताना नगर पाथर्डी रस्त्यावर भिंगार येथील समाधान हॉटेलजवळ आरोपींनी आपली दुचाकी बससमोर आडवी लावून बस थांबवली. यानंतर आरोपींनी बसमधील प्रवाशांसमोर एसटी वाहकास शिवीगाळ केली व बसमध्ये चढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी काम सुरू असताना अडथळा निर्माण करून धमकावल्याने वाहकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव

प्रत्यक्षदर्शी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष ठरली महत्त्वाची (Rigorous Imprisonment)

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सादर करण्यात आलेले कागदोपत्री पुरावे व साक्षीदारांच्या जबाबानुसार न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ॲड. वैशाली आर. राऊत यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी महिला पोलीस अंमलदार आर. व्ही. भोर्डे तसेच सहाय्यक फौजदार एस. आर. पठारे यांनी सहकार्य केले.