Riteish Deshmukh : बदलापूरमध्ये (Badalapur) शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या (Molestation) घटनेनं संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. शाळेतच मुलींसोबत गैरकृत्य घडल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा सेलिब्रिटींनी (Celebrity) देखील निषेध केला आहे. त्यातच आता अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यानेही या घटनेचा निषेध करत या गैरकृत्यासाठी शिवरायांच्या काळातील शिक्षा आरोपींना द्या,अशी मागणी करत त्या शिक्षेची आठवण करुन दिली आहे.
नक्की वाचा : पोलीस ठाण्यात पार पडला रक्षाबंधन सोहळा
बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर अभिनेता रितेश देशमुखने तीव्र शब्दात प्रतिक्रिया मांडली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत छत्रपती शिवरायांच्या काळातील चौरंग शिक्षेचा दाखला दिला आहे. अशा नराधमांसाठी शिवरायांच्या काळातील शिक्षेची तरतूद हवी, असं त्याने म्हटलं आहे. शिवरायांच्या काळातच महिलांसोबत असे गैरकृत्य करणाऱ्यांना चौरंग शिक्षा दिली जायची.
अवश्य वाचा : धक्कादायक!अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग
रितेशच्या पोस्टमध्ये नेमकं काय ? (Riteish Deshmukh)
अभिनेता रितेश देशमुखने एक्स मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलंय की, “एक पालक म्हणून मी पूर्णपणे वैतागलेला, दुखी आणि रागाने भरलो आहे. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना दिली ती – चौरंग शिक्षा – हा कायदे पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे.”
चौरंग शिक्षा म्हणजे काय? (Riteish Deshmukh)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शासन केलं जायचं. त्याकाळात रांझे गावच्या भिकाजी गुजर पाटलाने महिलेसोबत गैरकृत्य केल्यामुळे त्यांना चौरंग शिक्षा देण्यात आली होती. चौरंग शिक्षा म्हणजे आरोपीचे दोन्ही हात आणि पाय कलम करणे. रितेश देशमुखने बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीसाठी याच चौरंग शिक्षेची मागणी केली आहे.