Raja Shivaji Film:’राजा शिवाजी’चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक आला समोर 

0
Raja Shivaji Film:'राजा शिवाजी'चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक आला समोर 
Raja Shivaji Film:'राजा शिवाजी'चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक आला समोर 

Raja Shivaji Film : महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आता लवकरचराजा शिवाजी’ (Raja Shivaji Movie) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटातील रितेशचा पहिला लूक (First Look Relese) समोर आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शूटिंग सुरु  (Raja Shivaji Film)

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचा सुपरहिट मराठी चित्रपट ‘वेड’ प्रेक्षकांच्या कसोटीवर खरा उतरला. त्यानंतर आता रितेश छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत करणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं असून या चित्रपटाच्या सेटवरील रितेशचा लूक समोर आला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान मुघलांची भूमिका साकारणार आहेत. रितेश देशमुखचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्याचा हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे रितेशने या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना साइन केलं आहे.

नक्की वाचा : “भारतात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे”;अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य

रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार (Raja Shivaji Film)

रितेश देशमुख या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,अभिषेक,फरदीन आणि संजय यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे.अभिषेक आणि फरदीन मुघलांच्या भूमिकेत दिसतील तर रितेश पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसेल.’राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

अवश्य वाचा : ‘ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही,त्यांनी कुस्तीवर बोलू नये’- संग्राम जगताप 

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की,’इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही ३५० वर्षांची भावना आहे,असाधारण शौर्याची ठिणगी आहे. प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.’ लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here