Riteish deshmukh : रितेश देशमुखचा नवा चित्रपट येणार ? नवं पोस्टर आलं समोर

अभिनेता रितेश देशमुख याचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'राजा शिवाजी' असं या चित्रपटाचं नाव आहे.

0
Riteish deshmukh
Riteish deshmukh

नगर : अभिनेता रितेश देशमुख (Riteish deshmukh) याचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) असं या चित्रपटाचं नाव आहे. याबद्दल एक पोस्ट रितेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओ यांची ही निर्मिती असून स्वत: रितेश देशमुख याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र या पोस्टवरुन महाराजांच्या भूमिकेत नेमकं कोण दिसणार की रितेश स्वत: छत्रपतींची भूमिका साकारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

नक्की वाचा : कवी नामदेव ढसाळांचा झंझावत मोठ्या पडद्यावर येणार  

रितेशने पोस्टमध्ये काय आहे ? (Riteish deshmukh)

इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे. ’राजा शिवाजी’, अशी पोस्ट रितेशने केली आहे.

वश्य वाचा : अजय देवगणच्या ‘शैतान’मधील पहिलं गाणं रिलीज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here