CSK vs RCB: ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईची विजयी सलामी;आरसीबीला नमवले

आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रोमहर्षक सामना पार पडला. आरसीबीनं चेन्नईला 174 धावांचं आव्हान दिलं होतं.

0
CSK vs RCB
CSK vs RCB

नगर : गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai SuperKings)आयपीएलच्या १७ व्या सत्रात देखील विजयी सलामी दिली आहे. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) ६ गड्यांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ बाद १७३ धावांची मजल मारल्यानंतर चेन्नईने १८.४ षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या. चेन्नईच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरी करत विजय मिळवला. चेन्नईचा नवा कर्णधार बनलेल्या ऋतुराज गायकवाड विजयी नेतृत्व केले.

नक्की वाचा : महत्त्वाची बातमी! नगरसह अनेक रस्त्यांच्या वाहतुकीत बदल; असा असेल बदल

चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला सामनावीरचा पुरस्कार (CSK vs RCB)

या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४ षटकांत २९ धावा देत ४विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे त्याने झटपट आरसीबीच्या फलंदाजांना बाद केले. दरम्यान चेन्नईचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात मिळवलेला हा पहिलाच विजय होता. सामना जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाडने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तसेच काही गोष्टींवर काम करावे लागणार असल्याचे देखील सांगितले.

हेही पहा : इस्रोची यशस्वी भरारी!’पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी

दोन-तीन गोष्टींवर काम करायचे आहे – ऋतुराज गायकवाड (CSK vs RCB)

ऋतुराज गायकवाड म्हणाला की, आम्ही पहिल्यापासून नियंत्रणात होतो. सर्वांनी चांगला खेळ केला. आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिसला लवकर माघारी पाठवल्याने संघाला फायदा झाला. आम्हाला तीन झटपट विकेट मिळाल्या आणि त्यामुळे आम्हाला पुढील षटकांवर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली, हाच खरा टर्निंग पॉइंट होता. मी कर्णधारपदाचा आनंद लुटला. मला कधीही दबाव जाणवला नाही, अर्थातच माही भाई देखील होता,असं ऋतुराजने सांगितले. ऋतुराज पुढे म्हणाला की, दोन-तीन गोष्टींवर काम करायचे आहे, प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली. पण मला वाटते की पहिल्या ३ मधील फलंदाजांनी १५ व्या षटकापर्यंत फलंदाजी केली तर ते आणखी सोपे झाले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here