Road Safety Campaign 2026 : ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ च्या निमित्ताने मोटारसायकल रॅली उत्साहात संपन्न

Road Safety Campaign 2026 : 'रस्ता सुरक्षा अभियान २०२६' च्या निमित्ताने मोटारसायकल रॅली उत्साहात संपन्न

0

Road Safety Campaign 2026 : नगर : राज्यात १ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ (Road Safety Campaign 2026) राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर शहरा (Ahilyanagar City) मध्ये मोटारसायकल रॅली (Motorcycle Rally) अत्यंत उत्साहात पार पडली.

अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

​प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यात रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयातून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.

Road Safety Campaign 2026 : 'रस्ता सुरक्षा अभियान २०२६' च्या निमित्ताने मोटारसायकल रॅली उत्साहात संपन्न
Road Safety Campaign 2026 : ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ च्या निमित्ताने मोटारसायकल रॅली उत्साहात संपन्न

नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध

वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत जागृती (Road Safety Campaign 2026)

​या रॅलीद्वारे संपूर्ण शहरात हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे, वाहने सावकाश चालवणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच, रस्ता सुरक्षेबाबत वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले. या रॅलीत अधिकारी, कर्मचारी, दुचाकी वाहन वितरक आणि मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक-मालक यांनी सहभाग घेतला.