Robber : नगर : दरोड्याच्या (Robbery) तयारीत निघालेल्या मोक्कातील फरार सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने पोलीस (Police) कोठडीचे दर्शन घडविले. कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथे ही घटना घडली. मयूर अनिल गायकवाड (वय २१, रा. इंदिरानगर, ता. कोपरगाव), अमोल अविनाश कुंदे (वय २०, रा. एकरुखे, ता. राहाता), समाधान देविदास राठोड (वय २३, रा. करंजीबोलकी, ता. कोपरगाव), संदीप पुंजा बनकर (वय ३३, रा. द्वारकानगर रस्ता, शिर्डी, ता. राहाता) व उमेश तानाजी वायदंडे (वय २७, रा. गणेशनगर, ता. राहाता) असे जेरबंद आरोपींचे (Robber) नाव आहे.
हे देखील वाचा: जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही’- एकनाथ शिंदे
सापळा रचून पाच आरोपींना घेतले ताब्यात (Robber)
जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मोहीम जिल्हा पोलीस प्रशासनाने हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना माहिती मिळाली की, मयूर गायकवाड त्याच्या सहा साथीदारांसह दोन कारमधून दरोडा घालण्याच्या तयारीत निघाला आहे. त्यानुसार पथकाने शिर्डी-नाशिक रस्त्यावरील देर्डे फाट्याजवळ सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच दोन आरोपी पसार झाले. गणेश भिकुनाथ तेलोरे (रा. गणेशनगर, ता. राहाता) व राहुल शिवाजी शिदोरे (रा. गोकुळनगर, कोपरगाव) अशी पसार आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा: मराठा आरक्षणावर २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली भूमिका
जेरबंद आरोपींपैकी चार आरोपी सराईत गुन्हेगार (Robber)
पथकाने जेरबंद आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक तलवार, एक कटावणी, एक कत्ती, एक दांडके, मिरचीपूड, चार मोबाईल व दोन कार असा १० लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पथकाने जेरबंद आरोपींविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अवैध शस्त्रे बाळगणे व दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे. जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. जेरबंद आरोपींपैकी चार आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यातील मयूर गायकवाडवर या पूर्वी मोक्कासह तीन गुन्हे दाखल आहेत. तर अमोल कुंदेवर सहा, समाधान राठोडवर पाच, उमेश वायदंडेवर पाच गुन्हे दाखल आहेत.