Robbery : श्रीगोंदा : कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील शिंदे मळा (Robbery) परिसरात चार ते पाच दरोडेखोरांनी (Robber) धारदार शस्त्राने हल्ला करत दरोडा (Robbery) टाकला. यामध्ये पती-पत्नी गंभीर जखमी (Seriously Injured) करून घरातील दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना रविवारी (ता. २४) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र विश्वनाथ लगड व गीता राजेंद्र लगड जखमींची नावे आहेत.
नक्की वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य
दरोड्याचा गुन्हा दाखल
या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात राजेंद्र लगड यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र लगड हे आपल्या कुटुंबा सोबत घरात झोपले होते. रविवारी पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी घराचा आतून लावलेला दरवाजा उघडल्याचे लक्षात येताच राजेंद्र लगड आणि त्यांची पत्नीने चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी धारदार वस्तूच्या सहाय्याने त्यांचेवर वार करत घरात प्रवेश केला. घरातील मौल्यवान ऐवज कुठे ठेवला आहे असे विचारत दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या गीता लगड यांनी गळ्यातील तसेच कानातील सोन्याचे दागिने काढून दिले. मात्र, यावेळी एका कानातले निघत नसल्याने चोरट्यांनी त्यांच्या कानातील ओरबाडून काढले. तसेच राजेंद्र लगड यांच्या पँटच्या खिशात असलेले दहा हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. माघारी जाताना चोरट्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करत इतर खोल्यांकडे मोर्चा वळवला. त्यावेळी राजेंद्र लगड यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर
पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी जाऊन पाहणी (Robbery)
आरडाओरडा झाल्याने शेजारी राहणारे सयाजी लगड आणि संजय नलगे यांनी धाव आले. त्यांनी राजेंद्र लगड आणि गीता लगड यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
चोरट्यांच्या धुमाकूळ आणि पोलिसांची दिरंगाई..
चोरट्यांनी सुमारे एक तास धुमाकूळ घालत पती-पत्नीला बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने वार करत घरातील ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती पोलिसांना रात्री एक वाजण्याच्या सुमारास माहिती देऊन सुद्धा बेलवंडी पोलिसांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत घटनेची दखल घेतली नाही. या घटनेने बेलवंडी पोलिसांचा गुन्हेगारांवर कुठलाही धाक नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होऊ लागला आहे.