Robbery : दूध डेअरीची १७ लाख रुपयांची रोकड लुटणारी टोळी जेरबंद

Robbery : दूध डेअरीची १७ लाख रुपयांची रोकड लुटणारी टोळी जेरबंद

0
Robbery : दूध डेअरीची १७ लाख रुपयांची रोकड लुटणारी टोळी जेरबंद
Robbery : दूध डेअरीची १७ लाख रुपयांची रोकड लुटणारी टोळी जेरबंद

Robbery : नगर : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ॲग्रो प्रोडक्ट लि. कंपनीचे १७ लाख रुपये बँकेत भरणा करण्यासाठी चाललेल्याना लुटणारी (Robbery) टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने एमआयडीसी (MIDC), बोल्हेगाव परिसरातून जेरबंद केले आहे. या गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडून ४ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आला आहे.

नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल

ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे

सचिन राजेंद्र वायदंडे, (वय – २४, रा. गेट नं. ६, सम्राटनगर, नागापुर, एम.आय.डी.सी. ता. जि. अहिल्यानगर), शुभम मनोज गुळसकर, (वय २४, रा. बोल्हेगाव, एम.आय.डी.सी. ता. जि. अहिल्यानगर), अभिषेक लक्ष्मण जाधव, (वय २४, रा. नवनागापुर, गजानन कॉलनी, ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी शुभम मनोज गुळसकर (हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे.

अवश्य वाचा : गणेश मूर्तिकार वरील कारवाई थांबावी; संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन

डेअरीमध्ये काम करणाऱ्याचा गुन्हयामध्ये सहभाग (Robbery)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील घटना ठिकाणी आजूबाजूला रोडचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीची वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे फिर्यादीचे मुळा ॲग्रो प्रोडक्ट लि. ब्राम्हणी, ता. राहुरी या डेअरीमध्ये काम करणारा विधीसंघर्षीत बालक याचा गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस करता त्याने मुळा ॲग्रो प्रोडक्ट डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबत माहिती त्याचा मावसभाऊ अमोल शिंदे यास दिली होती. त्यानुसार अमोल शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे, शुभम गुळसकर, अभिषेक जाधव, पप्पु कुसळकर, मोहन लष्करे यांचेसह लुटीचा कट तयार करुन मोहन लष्करे याने कार घेवुन येवुन तसेच एक दुचाकीवर फिर्यादीचे गाडीवर पाळत ठेवली. तसेच डेअरीमधुन निघाल्यापासुनची संपूर्ण माहिती कारमधील बसलेल्या आरोपींना दिली. कारमधील व दुचाकीवरील आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून काचा फोडुन रोख रक्कम चोरली असल्याचे तपासात समोर आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.