Robbery : पारनेर, श्रीगोंदा, एमआयडीसी परिसरात दरोडा टाकणारी टोळी निष्पन्न ; दोघे जेरबंद

Robbery : पारनेर, श्रीगोंदा, एमआयडीसी परिसरात दरोडा टाकणारी टोळी निष्पन्न ; दोघे जेरबंद

0
Robbery : पारनेर, श्रीगोंदा, एमआयडीसी परिसरात दरोडा टाकणारी टोळी निष्पन्न ; दोघे जेरबंद
Robbery : पारनेर, श्रीगोंदा, एमआयडीसी परिसरात दरोडा टाकणारी टोळी निष्पन्न ; दोघे जेरबंद

Robbery : नगर : पारनेर, श्रीगोंदा तसेच एमआयडीसी परिसरात दरोडा (Robbery) टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने निष्पन्न केली. त्यातील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना पुढील तापासाठी पारनेर पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून विविध पोलीस ठाणे हददीत केलेल्या ६ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकारचा मोठा निर्णय

६ ठिकाणी चोरी केल्याची कबुली

सिध्देश सादीश काळे, (वय २२, रा.वाळुंज पारगाव, ता.अहिल्यानगर), श्रीहरी हरदास चव्हाण, (वय २५, रा.वडगाव गुप्ता) असे पारनेर तालुक्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पारनेर, भिंगार कॅम्प, सुपा, बेलवंडी व एमआयडीसी पोलीस ठाणे हददीत ६ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने काजल अजय भोसले, (रा.वाळुंज) हिने विक्री केल्याचे तपासात पुढे आले. या गुन्ह्यात सिध्देश सादीश काळे, अजय सादीश काळे, धीरज सादी काळे (सर्व रा.वाळुंज पारगाव), नागेश विक्रम भोसले, रा.घोसपुरी), गणेश सुरेश भोसले, (रा.पारगाव, ता.आष्टी, जि.बीड), बाळु झारू भोसले, (रा.जलसेनपिंपरी, ता.पारनेर), पवन भोसले, (रा.पढेगाव, ता.कोपरगाव), सुभाष भोसले, (रा.ता.पारनेर), यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर श्रीहरी हरदास चव्हाण, (रा.वडगाव गुप्ता) यांच्य्या विरोधात एमआयडीसी, बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : “भारतात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे”; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य

जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस (Robbery)

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पारनेर परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक थोरात, अंमलदार फुरकान शेख, रवींद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व महादेव भांड यांच्या पथकाने केली.