Robbery : पाथर्डीत सशस्त्र दरोडा

Robbery : पाथर्डीत सशस्त्र दरोडा

0
Robbery : पाथर्डीत सशस्त्र दरोडा
Robbery : पाथर्डीत सशस्त्र दरोडा

Robbery : नगर : महिलेच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून दरोडा (Robbery) घातल्याची घटना आज (ता. ८) पहाटेच्या वेळी पाथर्डी शहरातील दत्तनगर (धान्य गोडाऊन)येथे घडली. याप्रकरणी मिरा भुजग दहिफळे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून तीन दरोडेखोरांच्या विरोधात पाथर्डी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

Robbery : पाथर्डीत सशस्त्र दरोडा
Robbery : पाथर्डीत सशस्त्र दरोडा

नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

खिडकी तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश

मीरा दहिफळे या घरी एका रुममध्ये झोपल्या होत्या तर त्यांचे पती व मुलगी दुसऱ्या रूममध्ये झोपले होते. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घराच्या हॉलमधील खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मीरा दहिफळे या झोपल्या असताना यांच्या पाठीमागून एका चोराने केस ओढुन गळ्यावर धारदार शस्त्र लावले. दुसऱ्या चोराने मीरा दहिफळे यांचे पती व मुलगी झोपलेल्या रुमच्या दरवाजाची कड़ी लावली. त्यावेळी त्यांनी दहिफळे यांच्या गळ्यातील गंठण, कानातील झुंबर व हाताच्या बोटातील अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर लोखंडी शस्त्राने कपाटाचे दार उघडून कपाटात ठेवलेले अंदाजे शंभर ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व १३ हजार ५०० रुपये घेऊन चोर पसार झाले. त्यानंतर मीरा दहिफळे यांनी आरडओरडा केल्याने पती व मुली उठवले.

अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (Robbery)

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांनी चोरीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या चोरीमध्ये सव्वा सहा तोळे सोन्याचे दागिने, दहा तोळे चांदीचे दागिने आणि साडे तेरा हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेले आहे. या सशस्त्र दरोड्याच्या घटनेने पाथर्डी शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे करीत आहेत.