Robbery : १७ लाख रुपयांची रोकड लुटणारा आणखी एक आरोपी जेरबंद

Robbery : १७ लाख रुपयांची रोकड लुटणारा आणखी एक आरोपी जेरबंद

0
Robbery : १७ लाख रुपयांची रोकड लुटणारा आणखी एक आरोपी जेरबंद
Robbery : १७ लाख रुपयांची रोकड लुटणारा आणखी एक आरोपी जेरबंद

Robbery : नगर : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ॲग्रो प्रोडक्ट कंपनीचे १७ लाख रुपये बँकेत भरणा करण्यासाठी चाललेल्यांना लुटणारा (Robbery) आणखी एक आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले.

अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

ऋषीकेश अनिल कुसळकर, (वय २१, रा.राजलक्ष्मी निवास, बाळकृष्ण नगर, पेठ रोड, पंचवटी नाशिक) असे ताब्यात घेतल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी सचिन राजेंद्र वायदंडे (वय २४, रा. सम्राटनगर, नागापूर), शुभम मनोज गुळसकर (वय २४, रा. बोल्हेगाव), अभिषेक लक्ष्मण जाधव (वय २४, रा. नवनागापूर) यांना ताब्यात घेतले होते.

नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले (Robbery)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील पसार असलेल्या संशयित आरोपी कुसळकर हा पुणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.