Robbery : सशस्त्र दरोड्यातील चौघे ताब्यात; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Robbery : सशस्त्र दरोड्यातील चौघे ताब्यात; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Robbery : सशस्त्र दरोड्यातील चौघे ताब्यात; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Robbery : सशस्त्र दरोड्यातील चौघे ताब्यात; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Robbery : नगर : श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील वस्तीवर सशस्त्र दरोडा (Robbery) टाकणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी श्रीरामपूर पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले आहे.

नक्की वाचा : पूर्ववैमनस्यातून अपहृत तरुणाचा खून; आणखी पाच आरोपी ताब्यात

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

बबलू भास्कर जाधव (वय ३२, रा.चांदेकसारे, ता.कोपरगाव), सोनु दगडू पवार (वय २५, रा.सावळीविहीर, ता.राहाता), पंकज भाऊसाहेब सोनवणे (वय २५, रा.नगदवाडी, ता.कोपरगाव) सुनिल कडू पवार (वय २६, रा.खानापूर, ता.श्रीरामपूर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आकाश धनू माळी (रा.नगदवाडी, ता.कोपरगाव), व सोहम उर्फ समाधान माळी (रा.संगमनेर), दोघे पसारा) यांनी मिळून केला असल्याची त्यांनी सांगितले. तसेच हा गुन्हा सुनिल कडू पवार यांच्या सांगणेवरून केला असल्याचे तपासात पुढे आले.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार

मारहाण करत २४ तोळे सोने व ६० हजारांची लूट (Robbery)

मुंबई येथे नगररचना विभागात अधिकारी असलेले जितेंद्र भोपळे यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे असलेल्या वस्तीवर सहा जणांच्या कोयता गँगने दरोडा टाकला होता. यावेळी घरात एकट्या असलेल्या वृध्द महिलेला मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून २४ तोळे सोन्याचे दागिने व ६० हजार रूपयांची रक्कम लुटून नेल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल होता.


या गुन्ह्याचा समांतर तपास करता असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा पंकज सोनावणे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कोपरगाव परिसरात सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.


ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, रमीजराजा आत्तार, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, अरूण मोरे व महादेव लगड यांच्या पथकाने केली.