Robbery : राहुरी : दरोड्याच्या (Robbery) तयारीत असलेल्या परप्रांतीय टोळीला तुरुंगाचे दर्शन घडविण्यात राहुरी पोलीस (Police) पथकाला आज यश आले. या टोळीवर बिहार राज्य व दिल्लीत ३४ गुन्हे दाखल आहेत. या टोळीला जेरबंद केल्याने छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांतील चार गुन्हे (Crime) उघडकीस आले आहेत.
हे देखील वाचा: “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला”; पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
स्टेट बँक ऑफ इंडीयात दरोडा टाकण्याच्या तयारीत (Robbery)
७ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेदरम्यान राहुरी शहरातील नगर मनमाड महामार्गावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडीयात दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या चार अट्टल गुन्हेगारांना राहुरी पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने पकडून गजाआड केले. मात्र, दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, हवालदार प्रविण बागुल, पोलीस नाईक प्रवीण आहिरे, सुरज गायकवाड, नदिम शेख, सचिन ताजणे आदी पोलीस पथकाने राहुरी येथील नगर मनमाड महामार्गावर स्टेट बँकेसमोर छापा टाकला. त्यावेळी अज्ञात सहा तरुण बॅंक परिसरात संशयास्पद फिरताना दिसून आले. पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घातली. त्यावेळी चार जणांना जागेवरच मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र, दोघेजण मोटरसायकलवर पसार झाले.
नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार
नगर, औरंगाबाद व पुणे जिल्हयात जबरी चोरीची कबुली (Robbery)
यावेळी पोलीस पथकाने राहुल कुमार गुलाबचंद यादव (वय २३), सिंटुकुमार रामसिंग यादव (वय २९), अजित ऊर्फ गौतम गुरुददीन यादव (वय ४५), चंदनकुमार गुल्ला यादव (वय २६) या चार जणांना ताब्यात घेतले. तर रमन मुन्ना यादव, शंभु किस्टो यादव हे दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. सर्व आरोपी हे बिहार राज्यातील काठियार जिल्ह्यातील नयाटोला जुराबगंज, नथीला येथील रहिवाशी आहेत. पकडलेल्या आरोपींकडून चाकू, कत्ती, मिरची पूड व मोटरसायकली असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत, औरंगाबाद व पुणे जिल्हयात जबरी चोरी केल्याची कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करीत आहेत.