Robbery : नगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या १० आरोपींना (Accused) एमआयडीसी पोलिसांनी (Police) जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीतील दोन आरोपी सराईत गुन्हेगार (Criminal) आहेत.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार
आरोपींचा पाठलाग करत १० आरोपींना घेतले ताब्यात
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, विळद घाट परिसरातील एका हॉटेलच्या समोरील रस्त्या लगत काही आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार माणिक चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक रवाना केले. या पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पसार होण्याचा प्रयत्न केला. पथकाने आरोपींचा पाठलाग करत १० आरोपींना ताब्यात घेतले. मयूर पोपट बोरूडे (वय २४, रा. आठरे पाटील स्कूल जवळ, शेवाळे माळा, अहिल्यानगर), संकेत विजय बारस्कर, ऋतिक रमेश शिंदे, संतोष राम घोडके (तिघांचेही वय २४, रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर), अनिल वसंत घोरपडे (वय २६, रा. भुतकरवाडी, अहिल्यानगर), अनिकेत अनिल गायकवाड (रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर), ऋषिकेश राजू पाटोळे (वय २५, रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर), शिवम अनिल झेंडे (वय २४, रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर), अजय राजेश गायकवाड (वय २२, रा. भुतकरवाडी, अहिल्यानगर) व रोहित बाळू अटक (वय २४, रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : अखेर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची उद्या घरवापसी
आरोपींवर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल (Robbery)
पथकाने या आरोपींची झाडाझडती घेतली असता कोयता, लोखंडी पाईप, कुऱ्हाड, दोरी, मिरची पूड, लाकडी दांडके, चार दुचाकी, नऊ मोबाईल असा तीन लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जेरबंद आरोपींपैकी मयूर बोरूडेवर यापूर्वी तीन तर अनिल घोरपडेवर चार गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद आरोपींवर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे.