Robbery : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील विळद परिसरात रात्रीच्यावेळी मेंढपाळांच्या पालावर दरोडा (Robbery) टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Branch) जेरबंद केली आहे. आरोपींकडून तीन लाख ४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे दरोडा टाकल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्यांचा सरकारला संतप्त सवाल
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
भैय्या कडू काळे (वय १८, रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), ताराचंद विरूपन भोसले (वय ३५, रा.गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), विजय गौतम काळे (वय २३, रा.पानसवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर), नागेश विरूपन भोसले (वय २०, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), सोनुल लक्षरी भोसले (वय १९, रा.बिडकीन, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बदाम कडू काळे (रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), रघुवीर विरूपन भोसले (रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), महेश नंदू काळे (रा.खोसपुरी, ता.अहिल्यानगर) (सर्व पसार) यांनी मिळून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा : पोलिसाकडून स्वस्तात प्लॉट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक
सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Robbery)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार विळद परिसरात दरोडा टाकणारी टोळी ही छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, अरुण गांगुर्डे, भगवान धुळे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, भगवान थोरात, भाऊसाहेब काळे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे यांच्या पथकाने केली.