Robbery : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात दरोड्याच्या (Robbery) तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. संशयित आरोपींकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ५० हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतले काही संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध पोलीस गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ताब्यात घेतलेले संशयित आरोपी
सगड्या उंब-या काळे (वय -५०), मिथुन उंब-या काळे (वय-२६), सार्थक सगड्या काळे (वय-२३, तिघे रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), गणमाळ्या संजय चव्हाण (वय २३, रा. दिवटे मळा, वाघुंगे, ता. पारनेर जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजय सादिश काळे (रा. वाळुंज पारगाव, ता. जि. अहिल्यानगर) हा पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा
सापळा रचून आरोपी ताब्यात (Robbery)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार सुपा ते पारनेर रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेले काही संशयित रस्त्याच्याकडेला डबा धरून बसले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य एका दुचाकी असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच सगड्या उंब-या काळे याच्याविरुद्ध बेलवंडी, सुपा, पारनेर, घारगाव आदी पोलीस ठाण्यात तब्बल १३ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर मिथुन उंब-या काळे याच्याविरुद्ध अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात ७ गुन्हे दाखल आहे. तर सार्थक सगड्या काळे याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संमीर अभंग, पोलीस अंमलदार अतुल लोटके, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर यांच्या पथकाने केली आहे.



