Robbery | नगर: अहिल्यानगर (Ahilyanagar) तालुक्यातील गर्भगिरी फाटा बारदरी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी (Robbery) करणारे तीन संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला आहे.
हेही वाचा – देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच का सादर केला जातो? जाणून घ्या…

संशयित आरोपींची नावे (Robbery)
शुभम शहादेव बडे (वय २६, रा.वाणीनगर, पाईपलाईन रोड, सावेडी), सोहेल पापाभाई सय्यद (वय २९, रा. देवटाकळी, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर), अश्पाक नासिर पठाण (वय २८, रा. यशवंतनगर, भिंगार ता.जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वैष्णवी उणवने व रुपाली बनकर यांचेशी संगमनत करुन चोरी केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा – स्थानिक गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीबाबत मोठीकारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सापळा रुचून आरोपीस ताब्यात घेतले (Robbery)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार बारदरी परिसरात कोयत्याचा भाग दाखवा रस्ता लूट करणारे शुभम बडे व त्याचे साथीदार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रुचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा वैष्णवी राजेंद्र उणवने (वय २४, रा. सारंग अपार्टर्मेट, भगवान बाब चौक, अहिल्यानगर), रुपाली गजानन बनकर (वय २४, रा. डेअरी चौक, एन.आय.डी.सी) यांच्या सांगण्यावरून केल्या असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.

चोरीचा मुद्देमाल हस्तगत (Robbery)
पथकाने यांना ताब्यात घेतले असता तुमच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरलेला मुद्देमाल हा सुरज प्रदीप शहाणे (वय ३४, रा. दत्त मंदीर मागे शास्त्रीनगर, केडगाव, अहिल्यानगर), यांच्याकडे विक्री केली असल्याची समजली. पोलिसांनी खाक्या दाखवत चोरी केलेला दोन लाख ८८ हजार १०० रुपयांचे मुद्देमाल हस्तगत केला. घेतलेले हे संशयित आरोपी सराईत गुन्हेगारा असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई फाउंडेशन स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रशांत राठोड, अमृत आढाव, योगेश कर्डिले, सोनल भागवत, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे.



