Robbery : कुख्यात ‘सलीम–अलीम’ टोळी अटकेत; संभाव्य दरोडा टळला

Robbery : कुख्यात ‘सलीम–अलीम’ टोळी अटकेत; संभाव्य दरोडा टळला

0
Robbery : कुख्यात ‘सलीम–अलीम’ टोळी अटकेत; संभाव्य दरोडा टळला
Robbery : कुख्यात ‘सलीम–अलीम’ टोळी अटकेत; संभाव्य दरोडा टळला

Robbery : संगमनेर: वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील शांतता वारंवार भंग पावत असताना, चोऱ्या (Theft)घरफोडींच्या (Robbery) घटनांनी शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांनी (Sangamner City Police) रविवारी (ता.१) मध्यरात्री केलेल्या धडाकेबाज कारवाईने दिलासा मिळाला असून, संभाव्य मोठा दरोडा टळला आहे. शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने जीव धोक्यात घालून सशस्त्र सहा जणांच्या टोळीवर छापा टाकत कुख्यात ‘सलीम–अलीम’ टोळीला जेरबंद केले आहे.

नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

अनेक चोऱ्या व घरफोडींचा छडा लागण्याची शक्यता

विशेष म्हणजे या टोळीच्या अटकेमुळे शहर व तालुक्यातील अनेक चोऱ्या व घरफोडींचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.१) रात्री शहरात गस्त सुरू असताना कोल्हेवाडी रस्त्यावर तीन दुचाकींवरून काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक संतोष पगारे, हवालदार बाबा सातपुते, कॉन्स्टेबल खेडकर व चालक विजय खुळे यांच्या पथकाने या परिसरात गस्त वाढवली. सोमवारी (ता.२) पहाटे दोनच्या सुमारास कोल्हेवाडी रस्त्यालगतच्या काटवन परिसरात काहीजण दुचाकी उभ्या करून थांबले असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांना घेराव घातला. पोलिसांचे वाहन पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले.

हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?

शस्त्रांचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न (Robbery)

यावेळी त्यातील दोघांनी शस्त्रांचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी धैर्याने कारवाई करत त्यांना निष्प्रभ केले. एक आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून होंडा स्प्लेंडर, होंडा शाईन व प्लॅटिना अशा तीन दुचाकींसह पक्कड, कोयते, स्क्रू-ड्रायव्हर, गुप्ती, लाखंडी पान्हे, कुऱ्हाड व मिरची पावडर असा दरोड्यासाठी वापरण्यात येणारा साहित्यासाठा जप्त करण्यात आला. आरोपींचे तोंडावरील मुखवटे काढल्यानंतर कुख्यात अलीम अकबर पठाण (वय २६, रा. जमजम कॉलनी) याच्यासह वसीम मंसूर शेख ( वय ३८, मदिनानगर), नीलेश बाळासाहेब शेळके (वय ४०, वाघापूर), सलमान अकबर पठाण ( वय २४, कोल्हेवाडी रोड) आणि अनमोल कुरनवासी चव्हाण (वय २०, घुलेवाडी) यांची ओळख पटली. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत पहाटेच तीनबत्ती चौकाजवळून सलीम अकबर पठाण (वय २६, रा. जमजम कॉलनी) यालाही अटक केली. यामुळे शहरात दहशत निर्माण करणारी कुख्यात ‘सलीम–अलीम’ टोळी पूर्णतः पोलिसांच्या ताब्यात आली आहे. या टोळीवर यापूर्वीही चोऱ्या व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यांच्या चौकशीतून शहर व तालुक्यातील इतर गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता आहे.