Robbery : शेतवस्तीवर दरोडा घालणारे चौघे सराई गुन्हेगार गजाआड

Robbery : शेतवस्तीवर दरोडा घालणारे चौघे सराई गुन्हेगार गजाआड

0

Robbery : नगर : पारनेर (Parner) तालुक्यातील वडगाव सायताळ परिसरातील खामकर झाप येथे शेतवस्तीवर दरोडा (Robbery) घालणाऱ्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. पथकाने जेरबंद आरोपींकडून ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

नक्की वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय 

६९ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास

खामकर झाप येथील अंकुश भाऊ भोसले यांच्या घरात गुरुवारी (ता. ६) झोपलेले असताना चार व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यांनी अंकुश भोसले यांना मारहाण करत जखमी केले. दरोडेखोरांनी ६९ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला.

अवश्य वाचा : माेदींच्या तिसऱ्या टर्मची वाटचाल गाैरवशाली ठरणार; महसूलमंत्र्यांचा विश्वास

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी (Robbery)

या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथके रवाना केली होती. पथकाने पारनेर तालुक्यात तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील मिथून काळे व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला आहे. त्यानुसार पथकाने सुरेगाव येथील मिथून काळेच्या घरावर छापा टाकला असता तो त्याचे साथीदारांसह आढळून आला. पथकाने त्याला व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. मिथून उंबऱ्या काळे (वय २३), अक्षय उंबऱ्या भोसले (वय २६), संजय हातण्या भोसले (वय ५५, सर्व रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) व गंगाधर संदल चव्हाण (वय २१, रा. दिवटेवस्ती, वाघुंडे, ता. पारनेर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. मिथून काळेवर या पूर्वी सहा, अक्षय काळेवर १३, संजय भोसलेवर ११ तर गंगाधर चव्हाणवर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here