Robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी

Robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी

0
Robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी
Robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी

Robbery : नगर : राहुरी तालुक्यातील गुहा गावाच्या परिसरात दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना राहुरी पोलिसांनी (Police) मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या टोळीतील दोन आरोपी (Accused) पसार झाले आहेत. त्यांचा शोध पोलीस पथक घेत आहे. सुखदेव रामदास खिलदकर (वय ३०), साहिल सिकंदर सय्यद (वय २५, दोघे रा. नांदूर, ता. आष्टी, जि. बीड), अरुण बाळासाहेब बर्डे (वय २२), सोमनाथ रामदास गायकवाड (वय २७) व शक्तिमान रामदास गायकवाड (तिघे रा. कुरणवाडी, ता. राहुरी, जि. नगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

Robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी
Robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी

नक्की वाचा: मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करणार? वाचा सविस्तर

शक्तिमान झाला जखमी

राहुरी पोलीस नेहमीप्रमाणे रात्री गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, एक चारचाकी व एक दुचाकीवर काही जण गुहा परिसरात दरोडा घालण्यासाठी टेहळणी करत आहेत. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथके रवाना केली. राहुरी पोलिसांच्या पथकांनी छापा टाकला असता चारचाकी वाहनातील चार जण ताब्यात घेण्यात आले. तर एका दुचाकीवर बसून तीन जणांनी पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार एका पथकाने या दुचाकीचा पाठलाग केला. दुचाकी वेगात चालविण्याच्या प्रयत्नात दुचाकी चालक आरोपीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीवरील तीनही आरोपी खाली पडले. त्यातील दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मात्र, त्यातील शक्तिमान गायकवाड हा जखमी झाला. त्याला पळता न आल्याने पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. बाळू लहानू गायकवाड व नवनाथ तुकाराम पवार अशी पसार आरोपींची नावे आहेत. त्यांचा शोध पथक घेत आहे.

अवश्य वाचा: माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

आरोपींविरोधात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल (Robbery)

पथकाने जेरबंद आरोपींकडून धारदार शस्त्र, दोऱ्या, स्क्रू ड्रायव्हर, वेगवेगळे पान्हे, केबल कटर, लोखंडी कत्ती, लाइटर असे साहित्य हस्तगत केले. जेरबंद पाच आरोपींपैकी चार आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या पैकी सुखदेव खिलदकरवर यापूर्वी दोन, अरुण बर्डेवर दोन, सोमनाथ गायकवाडवर दोन तर शक्तिमान गायकवाडवर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. राहुरी पोलिसांनी टोळीतील सातही आरोपींविरोधात अवैध शस्त्र बाळगणे व दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here