Robbery : नगर : विळद (ता. नगर) परिसरातील गवळीवाडा येथील धबधब्याचा (Waterfall) आनंद घेण्यासाठी पर्यटक (Tourists) येत आहेत. मात्र, पर्यटकांवर दरोडा (Robbery) घालणारे पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. सुरेश रणजीत निकम (वय ३०), विलास संजय बर्डे (वय २२), रोहित संदीप शिंदे (वय १९, सर्व रा. कात्रड, ता. राहुरी), ज्ञानेश्वर भानुदास बर्डे (वय २१, मूळ रा. कोंढवड, ता. राहुरी) व शांताराम भानुदास काळकुंड (वय १९, रा. दत्त मंदिरा शेजारी, निंबळक, ता. नगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा: कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; एकजण ठार
मोबाईल, चांदीची चैन, अंगठी व रोख रक्कम हिस्कावून नेली
भिस्तबाग चौकातील पंचवटी नगर येथे राहणारे वैभव सहजराव हे फिरण्यासाठी गवळीवाडा येथील धबधब्यावर गेले होते. त्यावेळी पाच अनोळखी व्यक्तींनी सहजराव यांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल, चांदीची चैन, अंगठी व रोख रक्कम बळजबरीने हिस्कावून नेली. या प्रकरणी सहजराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला.
अवश्य वाचा: “आई कुस्ती जिंकली, मी हरलेय”…ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीला रामराम
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई (Robbery)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यानुसार पथकाने राहुरी, नगर तालुका व बोल्हेगाव परिसरातील सराईत गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरूवात केली. तसेच तांत्रिक पुराव्यांचा शोध सुरू केला. पथकाला माहिती मिळाली की, राहुरी तालुक्यातील कात्रड येथील सुरेश निकम व विलास बर्डे यांनी हा गुन्हा त्यांच्या तीन साथीदारांसह केला आहे. हे आरोपी कात्रड येथील स्मशानभूमीजवळ उभे आहेत. त्यानुसार पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने पुढील तपासासाठी आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.