Robbery संगमनेर : दरोडा (Robbery) घालण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सहा चोरट्यांपैकी तीन चोरट्यांना (Thief) जेरबंद करण्यात शहर पोलिसांना (Police) यश आले. मात्र, यातील तिघांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकल्याची घटना गुरुवारी (ता.१७) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील नवीन नगर रस्त्यावरील जठार हॉस्पिटलच्या मागे बागवान मळ्यात घडली असल्याने शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नक्की वाचा: शरद पवारांची सुरक्षा वाढणार, झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
तिघे अंधाराचा फायदा घेत पसार
शहरातील नवीन नगर रस्त्यावरील डॉ. नितीन जठार हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बागवान मळ्यात बंद पडलेल्या गोडाऊन परिसरात कलीम अकबर पठाण (वय २०, रा.जमजम कॉलनी, संगमनेर ), अरमान दिलदार सय्यद (वय २०, रा. अलकानगर,संगमनेर ), समीर सब्बीर अत्तार (वय ३८, रा. बाजारपेठ संगमनेर ), सदाम मन्सुरी (रा. सय्यद बाबा चौक संगमनेर), हलीम अकबर पठाण (रा. जमजम कॉलनी संगमनेर) आणि प्रशांत (पूर्ण नाव माहित नाही) हे सर्वजण अंधारामध्ये कुठतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना शहर पोलिसांनी छापा टाकत यातील कलीम अकबर पठाण, अरमान दिलदार सय्यद आणि समीर सब्बीर अत्तार यांना जागेवर जेरबंद केले. मात्र, सदाम मन्सुरी, हलीम अकबर आणि प्रशांत हे तिघे अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले.
अवश्य वाचा: दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल, विषयांची संख्या वाढणार
चोरट्यांकडून साहित्य पोलिसांनी केले जप्त (Robbery)
ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांकडून एक लोखंडी कटावणी, एक गलोर, लोखंडी गोल रॉड आदी दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल लुमा राघू भांगरे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभंग करत आहेत.