Robbery | संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथे घडलेल्या ज्वेलर्स दुकानातील दरोड्यातील (Robbery) दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या (Police) संयुक्त तपास पथकांना यश आले आहे. या घटनेनंतर दरोडेखोरांच्या मागावर गेलेल्या घारगाव पोलिसांना पारनेर पोलिसांची साथ मिळाली. त्यामुळे या दोन्ही पथकांनी दरोडेखोरांचा वासुंदे (ता.पारनेर) पर्यंत त्यांचा पाठलाग केला. आज पहाटेच्या सुमारास सुरुवातीला एकाला आणि नंतर दुसर्याला ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा – आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले तरी माघार नाही; भाऊसाहेब कांबळे यांचा पत्रकार परिषदेत निर्धार
पोलिसांनी आरोपींचा केला पाठलाग (Robbery)
साकूर बसस्थानकाच्या परिसरात संकेत सुभाष लोळगे यांच्या सराफा दुकानात तोंडाला स्कार्प गुंडाळलेले पाचजण शिरले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. या दरम्यान या घटनेची माहिती पोलीस मुख्यालयासह पारनेर पोलिसांनाही देण्यात आली होती. घारगाव पोलीस आणि पारनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने वासुंदेपर्यंत त्यांचा पाठलाग केला. रस्ताच संपल्याने दरोडेखोरांनी आपल्या दोन्ही दुचाकी सोडून देत डोंगरातून पळ काढला. अखेर रानात दडून बसला एकजण भल्या सकाळी पोलीस आणि ग्रामस्थांच्या हाती लागला. तर त्यानंतर काही वेळातच दुसराही सापडला.