Rohit pawar : नगर : युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला आहे. मात्र, युवा संघर्ष यात्रेला (Yuva Sangharsh Yatra) मिळता प्रतिसाद काही अदृश्य शक्तींना बघवत नाही. अदृश्य शक्तीकडून सध्या खाेट्या तक्रारींचा सपाटा सुरू आहे. दबावतंत्राचा वापर करून माझे साेशल मीडिया (Social media) अकाउंट बंद करण्याचा घाट घातला जात आहे, असा आराेप आमदार राेहित पवार (Rohit pawar) यांनी केला आहे, अशा अदृश्य शक्तींनी कितीही ताकद लावा, आम्ही लोकांचा आवाज बुलंद करतच राहू, असे प्रतिआव्हान रोहित पवार यांनी विरोधकांना दिलं आहे.
हे देखील वाचा : भाजप हटाव…देश बचाव; ‘आयटक’ची राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा उद्या नगरमध्ये
राेहित पवारांची सध्या युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. पवार यांनी राज्यातील प्रलंबित असलेली नोकरभरती, युवकांचे प्रश्न या मुद्यांवर युवा संघर्ष यात्रा सुरु केली होती. ही यात्रा पुणे ते नागपूर अशी काढण्यात आली आहे. ही यात्रा मराठा आरक्षण आंदोलनामुळं स्थगित करण्यात आली होती. सध्या या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या यात्रेच्या निमित्तानं ते युवकांशी आणि राज्यातील जनतेशी संवाद साधत असून त्यांनी विविध मुद्यांवर राज्य सरकारवर टीका केली आहे. मात्र, त्यांचे साेशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा घाट घातला जात आहे. रोहित पवार यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करता येत नसल्याचा स्क्रीनशॉट देखील प्रसिद्ध केला आहे.
नक्की वाचा : सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या तयारीत; हालचालींना वेग