Rohit Pawar : नगर : “सत्तास्थापनेच्या तडजोडीत जनमताने दिलेला ठसका विसरून ज्यांना जनतेनेही नाकारलं, अशांना क्लीनचीट दिली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) हीच जनता ‘मिर्च्यां’चा धूर देऊन, भाजपच्या (BJP) नाकी नऊ आणल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित, अशी टीका आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी केली.
हे देखील वाचा : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार
‘एक्स’ पाेस्ट करून केली टीका
अंमलबजावणी संचालयानं (ईडी) अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई रद्द केली. यामुळे प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला. यावरून आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ पाेस्ट करून टीका केली. त्यात म्हटले आहे की, “आगामी विधानसभा निवडणुकांत जनता मिर्च्यांचा धूर देईल.
अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीत तुतारीला पिपाणीचं टेन्शन!
ईडीच्या राजकारणाचा भाजपला सर्वाधिक फटका (Rohit Pawar)
लोकसभा निवडणुकांत ईडीच्या माध्यमातून केलेल्या राजकारणाचा भाजपला सर्वाधिक फटका बसला. दोषींवर कारवाई केलीच पाहिजे, परंतु, भाजपने दोषींना वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ करून घेतले, हे सर्वसामान्य जनतेला आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही पटलं नाही. हेच लोकसभेच्या निकालात दिसून आलं,” असेही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.