Rohit Pawar : कर्जतचा एसटी डेपो सुरू करण्याची आमदार रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar : कर्जतचा एसटी डेपो सुरू करण्याची आमदार रोहित पवारांची मागणी

0
Rohit Pawar : कर्जतचा एसटी डेपो सुरू करण्याची आमदार रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar : कर्जतचा एसटी डेपो सुरू करण्याची आमदार रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar : कर्जत : येथील एसटी (ST) आगाराचा प्रश्न मार्गी लागला असून काम पूर्णत्वास गेलेल्या एसटी डेपो सुरु करण्यात यावा. तसेच कर्जत व जामखेड तालुक्यासाठी पुरेशा नवीन एसटी बसेस आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर (Madhav Kusekar) यांच्याकडे केली. या आशयाचे पत्र नुकतेच त्यांनी एसटी महामंडळास दिले.

अवश्य वाचा : लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली;दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

कामाच्या श्रेयवादात हा डेपो सुरु केला जात नाही

मागील २५ वर्षांपासून कर्जत आगाराचा प्रश्न भिजत पडला होता. याच विषयावर अनेक निवडणुका लढविल्या गेल्या. मात्र, आगाराचा प्रश्न जैसे थे होता. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. त्यानुसार आमदार होताच रोहित पवार यांनी पहिल्या तीन-चार महिन्यातच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कर्जतच्या एसटी डेपोला मंजुरी आणली. त्याचे काम पूर्णत्वास देखील गेले. सरकार बदलामुळे आणि कामाच्या श्रेयवादात हा डेपो सुरु केला जात नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत डेपो सुरु करण्याची मागणी केली. गुरुवारी (ता.२७) आमदार पवार यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांची भेट घेत कर्जतचा पूर्णत्वास गेलेला डेपो तातडीने सुरु करण्याची मागणी केली.

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा’- संजय राऊत

जामखेड बस स्थानकासाठी नवीन बसेसचा प्रस्ताव (Rohit Pawar)

यासह डेपोसाठी आवश्यक मनुष्यबळ व नवीन एसटी बसेस उपलब्ध करुन देण्याबाबत एसटी महामंडळाचे जिल्हा नियंत्रक व आगार व्यवस्थापक यांनी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. तसेच जामखेड बस स्थानकासाठी देखील पुरेशा बस नाहीत. कार्यरत असलेल्या बसेस जुन्या झाल्या असून त्यांचे बिघाड होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना बसअभावी त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक या सर्वांनाच अनेक अडचणींना समोरे जावे लागते. जामखेड बस स्थानकासाठी नवीन बसेसचा प्रस्तावही शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आला असून तो मंजूर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. 

कर्जत एसटी आगार बांधकाम आणि व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्याच्या बांधकामास शासन स्तरावरून मान्यता मिळालेली असून हे बांधकाम सुरू आहे. मात्र या बांधकामासाठीची निविदा मूळ निविदा रकमेच्या दरापेक्षा कमी दराने प्राप्त झाल्याने काही रक्कम शिल्लक आहे.  व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्याचे बांधकाम झाल्यास या ठिकाणच्या व्यावसायिकांना व्यवसासाठी हक्काची जागा मिळणार आहे. शिवाय एसटी महामंडळालाही यातून उत्पन्न मिळेल आणि आगाराच्या अवतीभोवती होत असलेले अतिक्रमण थांबून वाहतूक व रहदारीचाही प्रश्न कायमचा सुटणार आहे याकडे देखील रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here