Rohit Pawar : नगर : विधानपरिषदेच्या (Legislative Council) ११ जागांसाठी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात महायुतीकडून नक्कीच चालू आहे. पण आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सर्व आमदारांवर त्याचा काहीही परिणाम हाेणार आहे. संध्याकाळचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने असेल, असा विश्वास आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा: आमदार रोहित पवार यांचे उपोषण मागे
पवार म्हणाले,
”जेव्हा महायुती अशा पद्धतीने राजकीय पुड्या जर बाहेर सोडत असेल त्याच्यावरुन काही प्रमाणात आपल्याला असं समजावं लागेल की, जे महायुतीचे सर्व नेते आहेत, ते किती लेव्हवला जाऊ शकतात. बघूया काय होते. नक्कीच कुठे ना कुठेतरी काही लोक हे आमिषाला आहारी जाऊ शकतात. पण आम्हाला विश्वास आहे की, महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील. असे रोहित पवार म्हणाले.
अवश्य वाचा: विधानसभेच्या निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकणार; शरद पवारांचा दावा
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान (Rohit Pawar)
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार असून संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार मैदानात उतरले आहेत. विधान परिषदेत महायुती की महाविकास आघाडी कोणाला पराभव स्विकारावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.