Rohit Pawar : कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने नेमला कन्सल्टंट : रोहित पवार

Rohit Pawar : कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने नेमला कन्सल्टंट : रोहित पवार

0
Rohit Pawar : कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने नेमला कन्सल्टंट : रोहित पवार

Rohit Pawar : कर्जत : २०१६-१७ साली मंत्री असणाऱ्या येथील लोकप्रतिनिधी कर्जत आगाराचे पत्र तयार होते, असे म्हणाले होते. मात्र, त्यांनी फक्त वेळ मारत नेली. त्यांना करता आले नाही. कारण करायला धमक लागते. कदाचित त्यांच्यात ती धमक नसावी. आपल्या सारखी वेशभूषा आणि कार्यक्रम इव्हेंट कॉपी करण्यासाठी त्यांनी २० लाख रुपये देत कन्सल्टंट नेमला, असा घणाघात आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचे नाव न घेता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. गुरुवारी कर्जत आगाराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या हस्ते कर्जत आगाराचे लोकार्पण पार पडले.

नक्की वाचा: मोठी बातमी! पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले,

येथील माजीमंत्री असणाऱ्या लोकप्रतिनिधीनी कर्जत पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी पोलीस चौकीची मागणी केली असता तुम्ही क्राईम रेट वाढवा तेव्हा ते मंजूर होते असे म्हणायचे. आपण दोन पोलीस ठाणे आणले. प्रशिक्षण केंद्र आणले. ते सर्वसामान्य जनतेसाठी. मागील काळात कर्जत बसस्थानक श्रीगोंदा, जामखेड, करमाळा, बारामती आणि नगरवर अवलंबून राहत होते. मात्र, ती परिस्थिती आपण निश्चित बदल करू. माझी ओळख ही कर्जत-जामखेडच्या जनतेमुळे झाली हे कदापी विसरणार नाही.

अवश्य वाचा: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज

माजी परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, (Rohit Pawar)

लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेली खुर्ची ही जनतेच्या कामासाठी असली तर तिचा उपयोग असतो. कर्जतच्या एसटी आगाराबाबत विभागातील वरिष्ठ अधिकारी नकार घंटा वाजवत होते. मी मंत्री असताना आमदार रोहित पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एका महिन्यात कर्जतच्या एसटी आगाराला मान्यता मिळवून दिली. तिचा आज वचनपूर्ती कार्यक्रम होत आहे, याचा मला आनंद आहे. सदरच्या एसटी बस आगारासाठी तुरुंगवास भोगलेल्या आंदोलनकर्त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.