Rohit Pawar : कर्जत : कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) ८ नगरसेवक यासह काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी विधानपरिषदेचे सभापती तथा भाजपाचे नेते आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात गुप्त बैठक झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लवकरच कर्जत नगरपंचायतीत खांदेपालट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सभापती प्रा. राम शिंदेंशी संपर्क साधला असता लवकरच जनतेला याचे उत्तर मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली. अनेक दिवसांपासून कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नाराजी उघड उघड दिसत होती, हे मात्र निश्चित.
नक्की वाचा : मोठी बातमी! मुंबईतील वॉटर टँकर सेवा बंद होणार
प्रत्येक निवडणुकीत राऊत कुटुंबियांना महत्वाचे पद दिल्याने नाराजी
कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एकहाती सत्ता मिळवत भाजपाच्या प्रा. राम शिंदेंच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२, काँग्रेसचे ३ आणि विरोधी भाजपाला २ असे जागा मिळाल्या होत्या. यात नगराध्यक्षापदी उषा राऊत तर सहयोगी असणाऱ्या काँग्रेसच्या रोहिणी घुले यांना उपनगराध्यक्षपदी संधी दिली होती. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत राऊत कुटुंबियांना महत्वाचे पद जाते यावर काही पक्षातील नगरसेवकांचा विरोध होता दिसत होता. मात्र, आमदार रोहित पवारांना उघड-उघड विरोध कोणी करायचा यावर एकसंघ होताना दिसत नव्हते.
अवश्य वाचा : कर्जमाफीच्या मुद्यावरुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावर किसान सभेची जोरदार टीका
महायुती सरकार आल्याने पुन्हा प्रा. राम शिंदेंना साथ (Rohit Pawar)
त्यात पाच वर्षे मागील पदाधिकारीच आपल्या पदावर कायम राहतील हा निर्णय पुढे आल्याने अडीच वर्षांनंतर इच्छुक असल्यामध्ये पुन्हा असंतोष उफाळून आला. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार आल्याने पुन्हा प्रा. राम शिंदेंना साथ देवून आपले काम मार्गी लावत विकासनिधी मिळवायचा यासाठी रविवारी रामनवमीचे औचित्य साधत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी सभापती प्रा. राम शिंदेंशी गुप्त बैठक घेत कर्जत नगरपंचायतीत खांदेपालट करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यात यश देखील मिळाले असल्याची भावना एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने दिली आहे.