Rohit Pawar | अजित पवारांचा अपघात की घातपात?; रोहित पवारांचे गंभीर आरोप

0

Rohit Pawar | नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं नुकतच विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) नेते कार्यकर्ते आणि इतर सामान्य लोकांनाही अनेक प्रश्न पडत आहेत. असेच प्रश्न आणि शंका आल्याचं अजित पवार यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही बोलून दाखवल्या होत्या. आमदार रोहित पवार यांनी आज (ता. १०) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. त्यांनी यावेळी फक्त तोंडी माहिती दिली नसून पीपीटी प्रेजेंटेशनद्वारे स्क्रिनवर त्यांनी अनेक गोष्टी तथ्यांच्या आधारावर दाखवून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – राजयोगाच्या नियमित अभ्यासाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो : साधना दिदी

वीआरएस कंपनीला आणखीही परवानगी (Rohit Pawar)

मागील १३ ते १४ दिवसांत अजित दादांच्या अपघाताची कुठलीच चौकशी झालेली नाही. हा जो अपघात झाला की अपघात की त्यापेक्षा थोडा वोगळा होता त्यामुळे शंका वाढली. दुर्दैव म्हणजे हे सगळं घडूनही या वीआरएस कंपनीला आणखीही परवानगी दिली आहे. त्यामुळे या तपासात उशीर झाला म्हणून खोटे अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – अकोले पंचायत समितीच्या महिलांनी कोरले चॅम्पियनशीप ट्रॉफीवर नाव

तीन वर्षांपासून चौकशी सुरूच (Rohit Pawar)

या वीआरएस कंपनीच्या विमानाला २०२३ ला जो अपघात झाला होता, त्याची चौकशी आज तीन वर्ष होत आले तरी झाला नाही, असाही थेट आरोप रोहित पवार यांनी केला. त्याचबरोबर हे विमान १६ वर्षे जुण होत. ते का इतक्या हाय प्रोफाईल व्यक्तीला वापरलं असाही प्रश्न रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ही कंपनी कागदपत्रांवर छेडछाड केल्याच्याही घटना घडल्याचे, असंही आरोप त्यांनी केले.

आम्हाला शंका (Rohit Pawar)

हे विमान तसं हवेतच इकडे तिकडं होऊन कोसळलं आहे. त्यामुळे यांच्याबद्दल आम्हाला शंका आहे. इतका मोठा अपघात झाल्यानंतरही या वीआरएस कंपनीत मुख्यमंत्र्यांसारखी व्यक्ती प्रवास करते. हे कसं? आजही फक्त विमान कोसळल इतकेच सीसीटीव्ही मिळाले आहेत इतर का नाही असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. त्याचवेळी या कंपनीचा मालक म्हणतो विमान ठिक होतं, पुढे काही दिसत नसल्याने अपघात झाला असावा, असं ते म्हणतात.

व्हिडिओ प्रेझेंटेशन (Rohit Pawar)

आज अजितदादा आपल्यासोबत नसले तरी विचारांनी ते आपल्यासोबत आहेत, रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी, त्यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनही केलं. सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी अजित दादांची क्रू तयारी झाली. ७ वाजून ३ मिनिटांनी बारामती येथी हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी ८.७३ ते ८.४५ दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल.९ वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत, अशी बातमी समोर आली होती. तर, ९.४५ वाजता अजित पवार गेल्याची बातमी समोर आली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

त्याचबरोबर, हे विमान २ दिवस आधी सुरतला जाऊन आले होते. याचे मालक म्हणाले, हवामानामुळे अपघात झाला असावा अशीही माहिती रोहित पवारांनी दिली. ग्रामपंचायत सीसीटीव्ही समोर आलं आणि त्यातून हवामान परिस्थिती समोर आली आहे. CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येतं की, कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं असेल. मॅकेनिकल फेल्युअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रूटीन मेंटेनस झाला नव्हता का? असे प्रश्न उपस्थित होतं आहेत, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here