Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

0
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Rohit Pawar : कर्जत : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताविषयी वारंवार प्रश्न उपस्थित करून केंद्रासह राज्य सरकारचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास सुद्धा धोका उदभवू शकतो अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) द्यावी अशी विनंती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी नितीन पाटील यांना देण्यात आले.

नक्की वाचा : माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा गौरव !

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती विमान अपघातात निधन झाले. या अपघाती मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे अशी राज्यातील जनतेची व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. संबंधित विमान दुर्घटना ही केवळ अपघात होता की घातपात याचा उलगडा व्हावा यासाठी आमदार रोहित पवार मागील पंधरा दिवसांपासून स्वता:च्या जीवाची पर्वा न करता पत्रकार परिषदेद्वारे आपली भूमिका प्रसार माध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेच्या समोर सातत्याने आणि निर्भीडपणे मांडत आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अवश्य वाचा : लव्ह मॅरेजसाठी लागणार आई-वडिलांची परवानगी? नवा कायदा नेमका काय ?

पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (Rohit Pawar )

राज्यातील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने सरकारने त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी जेष्ठनेते बाळासाहेब साळुंके, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, युवकचे विशाल मेहेत्रे, रघुआबा काळदाते, नामदेव थोरात, राजेंद्र देशमुख, पूजा सुर्यवंशी, अड बाळासाहेब शिंदे, गुलाब तनपुरे आदींनी सोमवारी प्रांताधिकारी नितीन पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दीपक शहाणे, नितीन धांडे, राम कानगुडे, ऋषिकेश धांडे, अभय बोरा, तात्या ढेरे, विलास धांडे, पोपट खोसे, प्रसाद जेवरे, दिलीप जाधव, मुश्ताक सय्यद, रजाक झारेकरी, ज्ञानदेव लष्कर, प्रीती जेवरे, संजय भिसे, राहुल नेटके, सुमित भैलुमे, दादा चव्हाण, दीपक यादव यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.