Rohit Pawar : बारामती ॲग्राेने खरेदी केलेला कारखाना जप्त; ईडीचा राेहित पवारांना झटका

Rohit Pawar : बारामती ॲग्राेने खरेदी केलेला कारखाना जप्त; ईडीचा राेहित पवारांना झटका

0
Rohit Pawar

ED : नगर : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या ताब्यात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची तब्बल १६१.३० एकर जमिनीसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार

प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप

Rohit Pawar

कन्नड सहकारी साखर कारखाना ५० कोटी रुपयांमध्ये अ‍ॅग्रो लिमिटेडने खरेदी केला होता. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी ईडीने बारामती अ‍ॅग्रोची चौकशी केली. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला”; पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा

आगामी लोकसभा निवडणुकीमुले कारवाई चर्चेत (Rohit Pawar)

आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here