Rohit Pawar : नगर : लाेकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) सत्ताधारी, विराेधकांमध्ये आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी झडत आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर माझ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासारखी कारवाई होईल, अशी भीती आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोमवार (ता. २२) व्यक्त केली. लोकसभा निवडणूक होऊ द्या, त्यानंतर तुझ्याकडे पाहू. तुझा अरविंद केजरीवाल करू, अशी धमकी भाजपच्या (BJP) कोअर कमिटीच्या लोकांनी मला दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
हे देखील वाचा: लंकेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचा माेठा गाैप्यस्फाेट
मी धमक्यांना भीत नाही
रोहित पवार यांनी इंदापुरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आल्यानंतर त्यांनी संवाद साधला. राेहित पवार म्हणाले, माझ्यावर आत्तापर्यंत अनेकवेळा कारवाई झाली. विशेषतः लाेकसभा निवडणूक झाल्यानंतर माझ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी कारवाई हाेण्याची शक्यता आहे. पण मी अशा धमक्यांना भीत नाही. देशात बदल्याचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे.
नक्की वाचा: शिर्डी लाेकसभेसाठी बड्या नेत्याचा अर्ज; दिग्गजांची उपस्थिती