Rohit Pawar : नगर : माझा भाऊ पार्थ पवारचा (Parth Pawar) पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पण पार्थचे वडील अजित पवार (Ajit Pawar) स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजितदादा करत आहेत. मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय, अशी प्रतिज्ञाच रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भावाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचलला आहे.
हे देखील वाचा: सुजय विखे २९ काेटींचे धनी
महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे उमेदवार
मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे रिंगणात उतरले आहेत.
नक्की वाचा: तुझा अरविंद केजरीवाल करू; भाजप नेत्यांकडून कारवाईच्या धमक्या, राेहित पवारांचा आराेप
पार्थ पवारांचा केला होता पराभव (Rohit Pawar)
मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. यावरुन या मतदारसंघातील त्यांची ताकद लक्षात येऊ शकते. त्यामुळे यंदा संजोग वाघेरे त्यांच्या वर्चस्वाला धक्का देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.