Rohit Pawar : माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल

Rohit Pawar : माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल

0
Rohit Pawar
Rohit Pawar : माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल

Rohit Pawar : नगर : पाणी टंचाईच्या (Water shortage) फेऱ्यातून महिलांची सुटका कधी? असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. या संदर्भातील एक्स व्हिडिओ आणि पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Rohit Pawar
Rohit Pawar

नक्की वाचा : मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून

महिला आणि चिमुकल्यांना पाण्याची गरज

रोहित पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणुकीच्या प्रचारात महिलांना पैसे वाटले. त्यावेळी ते पाणी वाटल्याचे पैसे असल्याचा दावा अमरावतीच्या खासदारांनी केला होता. आज या महिला आणि चिमुकल्यांना पैसे नाही, तर पाण्याची गरज आहे, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. खासदार होळीला या महिलांसोबत फेर धरतात. पण पाणी टंचाईच्या या फेऱ्यातून त्यांची सुटका कधी होणार आहे. यातून येथील महिलांची सुटका होण्यासाठी माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here