Rohit Pawar:’भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे आजारी,त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत’-रोहित पवार

0
Rohit Pawar:'भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे आजारी,त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत'-रोहित पवार
Rohit Pawar:'भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे आजारी,त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत'-रोहित पवार

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील,त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत,असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अण्णा हजारे (Anna Hajare)यांना लगावला. महायुतीचं सरकार आल्यानंतर आता पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा असल्याचे ही त्यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं.

नक्की वाचा : वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी मंजूर,अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय  

‘अण्णा हजारे आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील’ (Rohit Pawar)

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे ईव्हीएम मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलन करत आहेत. आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत. ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.  

अवश्य वाचा : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा  

राम शिंदे यांनी मोदी-शाहांना आव्हान दिलं (Rohit Pawar)

कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर फेरतपासणीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी शिंदे यांच्यावर टीका केली. राम शिंदे यांनी फेर तपासणी करण्याची मागणी करत एक प्रकारे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिलं असल्याचत्यांनी सांगितलं. व्हीव्हीपॅटमध्ये काही गोंधळ आहे असं मला वाटत नाही. पण ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here