Rohit Pawar:’राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’-रोहित पवार

राज ठाकरेंचा मी फॅन होतो. पण आता ते दिल्लीचा आदेश पाळत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

0
Rohit Pawar
Rohit Pawar

नगर : राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या विरोधात बोलावं,असं वक्तव्य आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपनं (BJP) केलं आहे. द्वेष निर्माण केला जात आहे. याबाबत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बोलावं असेही रोहित पवार म्हणालेत.

नक्की वाचा : ‘तुम्ही सरकारमध्ये असताना देवळात वाजवण्याची घंटा ही दिली नाही’-अजित पवार

‘सत्तेतील लोकांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे’ (Rohit Pawar)

राज ठाकरेंचा मी फॅन होतो. पण आता ते दिल्लीचा आदेश पाळत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. भाजपला मतविभागणी करायची आहे. लोक त्यांना आता सुपारीबाज पक्ष म्हणत असल्याचे त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. ते गुणरत्न सदावर्ते यांनी हाणून पाडले. ते फडणवीस यांचे जवळचे असल्याचे रोहित पवार म्हणाले. ते सत्ताधारी लोकांना खेळवत ठेवत आहेत. स्पष्ट भूमिका सत्तेतील लोकांनी घेतली पाहिजे. सत्तेतील लोकांनी सांगावं की, आम्हाला जमणार नाही. त्यांना लाडकी खुर्ची जपायची आहे. सुपारी बाजांना याना सांभाळायचं असल्याचे रोहित पवार म्हणाले.

अवश्य वाचा : “मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार”;देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

‘विधानसभेत कोणाला खड्यासारखं बाजूला करायचं याचा निर्णय जनता घेईल’ 

रोहित पवार यावेळी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत कोणाला खड्यासारखं बाजूला करायचं याचा निर्णय लोक घेतील. म्हाडाचे फ्लॅट कार्यकर्त्यांना दिल्याचा प्रकार होत आहे. महायुतीचे सरकार नेहमी थट्टा करत असल्याचे पवार म्हणाले. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरही रोहित पवारांनी टीका केली. माझा व्यवसाय तुम्ही काय काढताय. ते ईडी काढेल, मी कष्टाने कमावलं आहे. बार्शीत दहशतीचे वातावरण आहे. ईडीकडे माझ्याकडे लक्ष ठेवून आहे. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत,असंही रोहित पवार म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here