Rohit Pawar:”आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये प्रवेश करतील” -रोहित पवार

0
Rohit Pawar:
Rohit Pawar:"आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये प्रवेश करतील" -रोहित पवार

नगर : संग्राम जगताप (Sangram Jagtap) २०२९ साली राष्ट्रवादीमधून निवडणूक (Election in 2029) लढवतील असे वाटत नाही. आगामी काळात ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश(Party entry into BJP) करतील, असा मोठा दावा (Claim) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. सोलापूरमधील करमाळ्यात झालेल्या सभेत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी  दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी, असं वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी हा दावा केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नक्की वाचा: हैद्राबादचं खुराट बोकड आलं अन् काहीतरी बडबड करुन गेलं;संग्राम जगताप यांची असदुद्दीन ओवीसींवर खोचक टीका 

संग्राम जगताप यांनी आपला नेता बदलला आहे- रोहित पवार (Rohit Pawar)

रोहित पवार म्हणाले की,आमदार संग्राम जगताप हे २०२९ साली राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवतील असे वाटत नाही. आगामी काळात ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील. संग्राम जगताप पक्षाच्या प्रमुखांचे देखील ऐकत नाहीत. त्यामुळे संग्राम जगताप यांनी आपला नेता बदलला आहे,असं सध्या दिसत आहे. भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. अजूनही हे ऑपरेशन संपलेले नाही. या ऑपरेशनचे सत्र दोन सुरू झाले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते फोडले जात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. आता रोहित पवार यांच्या दाव्यावर संग्राम जगताप काय बोलणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अवश्य वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर   

अजित पवार यांची संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस (Rohit Pawar)

आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाच्या नोटिशीनंतरही संग्राम जगताप यांनी मुस्लिम विरोधात वक्तव्यं सुरूच आहेत. अहिल्यानगरमधील सभेत बोलताना संग्राम जगताप यांनी आता आपल्याला हा देश, धर्म सुरक्षित ठेवायचा आहे, त्यामुळे आपले पण दोन-चार लोक आत गेले तरी हरकत नाही, पण या लोकांना आता प्रत्युत्तर द्या, असे वक्तव्य केले. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.