Rohit Pawar : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धोक्याची जाणीव झाली आहे, त्यामुळे ते गृहमंत्री पद मागत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षातील कोण मंत्री होणार हे त्यांनी ठरवले पाहिजे. मात्र, भाजपच ते ठरवताना दिसत असल्याचे वक्तव्य आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे. ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल. त्यांचा अनुभव आहे. त्या ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना देखील संधी मिळु शकेल,असंही रोहित पवार म्हणालेत.
नक्की वाचा : कधी होणार यंदाचा महा कुंभमेळा? वाचा सविस्तर…
रोहित पवार यांचा अजित पवार यांना टोला (Rohit Pawar)
यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला. आपल्या पक्षात कोण मंत्री व्हावं ते ठरवण्याचा अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाचा असतो. मात्र,अजित पवारांच्या पक्षात सगळं काही भाजपचे दिल्लीतले नेते ठरवत आहेत. २०२९ मध्ये शत प्रतिशत भाजपच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे.
अवश्य वाचा : अभिनेत्री रिंकू राजगुरूने केली नव्या चित्रपटाची घोषणा! मुहूर्त पडला पार
‘भाजपला लाडक्या बहीण योजनेचा लाभ झालाय’ (Rohit Pawar)
विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट ८८.०६ टक्के आहे. तर महायुतीचा एकत्रित स्ट्राईक रेट ८१ टक्के राहिला आहे. लोकसभेला ३० टक्यांच्या आसपास होता. भाजपने १०० आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली. त्यातील ९५ निवडून आले. लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच लाभ या निवडणुकीत भाजपला झाला. भाजपचे उमेदवार होते तिथे १० टक्यांचा लाभ ईव्हीएममध्ये फेरफार करुन झाला असल्याचे दिसते.तर,अजित पवार आणि शिंदे यांचे उमेदवार होते तिथे आठ टक्के फेरफार झाल्याचे दिसत आहे.