Rohit Pawar :’देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार 

देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांवर केली आहे.

0
Rohit Pawar
Rohit Pawar

नगर : देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांवर (Devendra Fadanvis) केली आहे. एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधील (Akluj)एका प्रचारसभेत बोलताना केले होते. या विधानाला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

नक्की वाचा : चेन्नईचा हैदराबादवर दणदणीत विजय;तुषार देशपांडेची तुफान खेळी

“खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात देवेंद्र फडणवीस यांना सुवर्णपदक मिळेल”(Rohit Pawar)

“खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच सुवर्णपदक मिळेल. आज ते ज्याला ईश्वराचा आशीर्वाद म्हणत आहेत, तो ईश्वराचा आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत”,अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही कुणाला येडं बनवता? अस म्हणत ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल, असं ही रोहित पवार म्हणालेत.

अवश्य वाचा : सावधान! नगर जिल्ह्यात पुढील तीन तासांत वादळी पावसाचा इशारा

कोणी माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही ((Rohit Pawar)

रविवारी (ता.२८) अकलूजमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी विश्वासघात केला, तर देव त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. “मी कोणाच्या वाट्याला जात नाही. कोणाचं वाईट चिंतत नाही आणि कोणाला त्रासही देत नाही. माझ्यावर आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. पांडुरंगांचा आशिर्वाद आहे, पण कोणी माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडतच नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या याच वाक्यावरून रोहित पवारांनी त्यांना धारेवर धरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here