Rohit Sharma : श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकादमीतून भारतासाठी क्रिकेटपटू मिळतील : रोहित शर्मा

Rohit Sharma : श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकादमीतून भारतासाठी क्रिकेटपटू मिळतील : रोहित शर्मा

0

Rohit Sharma : कर्जत : भारतासाठी वर्ल्डकप (World Cup) जिंकणे आमचे ध्येय होते. ग्रामीण भागातून चांगले क्रिकेटपटू व्हावे, हीच भावना या अकादमी उभारण्यात आहे. या अकादमीतून भविष्यात शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल यांसारखे उत्तम खेळाडू भारताला मिळतील. या भूमीत आल्यावर मनाला शांती मिळाली. मी परत नक्की येईल, असे आश्वासन क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी दिले. राशीन (ता.कर्जत) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुल भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. रोहित शर्मा यांनी मराठीत भाषण करीत उपस्थितांची मने जिंकली.

Rohit Sharma : श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकादमीतून भारतासाठी क्रिकेटपटू मिळतील : रोहित शर्मा
Rohit Sharma : श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकादमीतून भारतासाठी क्रिकेटपटू मिळतील : रोहित शर्मा

अवश्य वाचा: पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

भव्य स्टेडियम व संकुलचे रोहित शर्मांच्या हस्ते भूमिपूजन

यावेळी इंडियन आयडल फेम गायक रोहित राऊत, संगीत सम्राट फेम श्रावणी महाजन यांच्या हिंदी-मराठी गाण्याची मेजवानीने तर तांबडी चामडी फेम डीजे क्रेटेक्स यांनी कार्यक्रमात रंगत वाढवली. कर्जत-जामखेड एकात्मिक संस्था आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची क्रीक किंगडम क्रिकेट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तरुण खेळाडूसाठी हे भव्य स्टेडियम आणि संकुल उभारण्यात येत असून त्याचे भूमिपूजन भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले.

नक्की वाचा: दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

आमदार रोहित पवार म्हणाले (Rohit Sharma)

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, मी सुद्धा कर्णधार रोहित शर्माचा मोठा फॅन आहे. भारतीय खेळाडू देशाचे नाव उज्वल करीत असतात. राशीन भूमीत आज भव्य स्टेडियम आणि संकुल उभारणार असून ते रयत संस्थेस दान केले जाणार आहे. ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, हीच भावना अकादमी आणि क्रीडा संकुल उभारण्याची आहे. हा राशीनचा सन्मान आहे की क्रिकेटमधील जगज्जेता आज आपल्यात उपस्थित आहे. याप्रसंगी आमदार पवार यांनी रोहित शर्माशी संवाद साधत पुन्हा मतदारसंघात यावे, अशी मागणी केली. आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात रोहित शर्माकडे तमाम भारतीयांना आणखी एक वर्ल्ड कपची लवकरच भेट द्यावी, अशी विनंती केली. सर्व खेळाडू तमाम भारतीयाचा श्वास आहे. भारत देश हा विविध खेळाने भरलेला आहे. त्यांना व्यासपीठ मिळाल्यास नक्कीच संधीचे सोने करतील. दोन रोहित एकाच व्यासपीठावर असल्याने युवकांचा रोहित-रोहित जल्लोष घुमत होता.